Godrej Group : 124 वर्षांची परंपरा असलेल्या गोदरेज समुहाचं विभाजन होणार? ABP Majha
Continues below advertisement
भारतातल्या मोठ्या उद्योग समुहांपैकी एक म्हणजे गोदरेज समूह... मात्र याच गोदरेज समुहाचं विभाजन होणार असल्याचं वृत्त पीटीआयच्या हवाल्यातून समोर येतंय. विभाजनानंतर समुहाचा एक भाग आदि गोदरेज , त्यांचे भाऊ नादिर यांच्याकडे जाईल तर दुसरा भाग जमशेद गोदरेज आणि स्मिता गोदरेज कृष्णा यांच्या वाट्याला येईल... १२४ वर्षे जुन्या समुहाची सौहार्दपूर्ण वाटणी करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतल्याचं समजतंय. संभाव्य विभाजनाबाबत गोदरेज कुटुंबानं एक संयुक्त निवेदन जाहीर केलंय. भागधारकांचं हित सुनिश्चित करण्यासाठी गोदरेज कुटुंब काही दीर्घकालीन योजनेवर काम करत आहे. आणि त्या अनुषंगानं काही भागधारकांचा सल्ला मागितल्याचं त्या निवेदनात म्हटलंय.
Continues below advertisement