Goa : गोव्यात समुद्र किनाऱ्यावर दारु पिण्यास बंदी, नियमांचं उल्लंघन केल्यास 50 हजारांपर्यंत दंड
गोवा सरकारने राज्यातील पर्यटनाशी संबंधित काही नियम कठोर केले आहेत. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता राखण्यासाठी सरकारकडून काही नियम जारी करण्यात आले आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना आर्थिक दंड ठोठावला जाणार आहे. त्यांच्यावर गोवा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.