GitHub : प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो वापरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात खळबळ
वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केलीये.. त्याचबरोबर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली, मात्र ते दखल घेत नसल्याचा आरोप प्रियंका चतुर्वेदी यांनी केलाय.