Ghaziabad : लिफ्टमध्ये पाळिव कुत्र्यानं घेतला लहानमुलाचा चावा, मालकिणीनं विचारपूसही केली नाही
लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्यानं एका मुलाला चावा घेतला, पण कुत्र्याला घेऊन जाणाऱ्या महिलेनं त्या छोट्या मुलाची साधी विचारपूसही केली नाही. वेदनेमुळे मुलगा विव्हळत असताना त्या महिलेनं साधी दखलही घेतली नाही. महिलेच्या या असंवेदनशीलतेनंतर मुलाच्या वडिलांनी नंदग्राम पोलीस ठाण्यात महिलेविरोधात एफआयआर दाखल केला आहे.