Ganga River Floods Uttar Pradesh : गंगा नदीत पूर, वाराणसी शहरात हाहाकार
Continues below advertisement
महापुरामुळे गंगा नदीचं पाणी घाट सोडून वाराणसी शहरात शिरायला सुरुवात झालेय. दर तासाला 1 सेंटीमीटर या वेगानं गंगा नदीची पाणी पातळी वाढतेय त्यामुले एरव्ही गंगेत फिरणाऱ्या होड्या वाराणसीच्या गल्ल्यांमध्ये फिरवण्याची वेळ आलेय... अस्सी घाट, मणिकर्णिका घाट या परिसरात पाच ते सहा फूट पाणी साचलंय... गंगा घाटांवर पौरोहित्य करणाऱ्यांचेही या पुरामुळे मोठे हाल झाले आहेत... गंगेची वाढती पाणी पातळी पाहता उत्तर प्रदेश सरकारनं एनडीआरएफची पथकं तैनात करून ठेवली आहेत. तसंच स्थलांतर करण्याची वेळ आली तर व्यवस्था सज्ज ठेवण्याचे आदेश जल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत
Continues below advertisement