Fuel Rates Reduced : इंधन झालं स्वस्त! जाणून घ्या काल आणि आजच्या पेट्रोल-डिझेलच्या दरांतील फरक
Petrol-Diesel Price Today 04 November 2021, iocl.com : केंद्र सरकारच्या वतीनं देशातील जनतेला दिवाळीचं (Diwali 2021) मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. काल (बुधवारी) केंद्रीय अर्थ मंत्रालयानं (Finance Ministry) दोन्ही इंधनाच्या दरांवरील सेंट्रल एक्साइज ड्यूटी (Excise Duty Cut) मध्ये घट करणार असल्याची घोषणा केली होती. पेट्रोलवर यामध्ये 5 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवर 10 रुपयांची घट करण्यात आली आहे. आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे आज मुंबईतील एक लिटर पेट्रोलची किंमत 109.98 रुपये आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.