Kalyan Singh Passes Away : Uttar Pradesh चे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन

Kalyan Singh Passes Away: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन झालं आहे. त्यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांनी SGPGI मध्ये अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. कल्याण सिंह दोन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले तर राजस्थानचे राज्यपालपदही त्यांनी भुषवले होते. कल्याण सिंह रुग्णालयात दाखल झाल्यापासून यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना अनेकवेळा भेटले होते. याशिवाय भाजपचे अनेक दिग्गज नेतेही रुग्णालयात जाऊन त्यांची प्रकृती जाणून घेत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola