Manmohan Singh : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण,ताप आल्याने एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली :  देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत रोज विक्रमी भर पडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येने दरदिवशी दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून लसींचा तुटवडा, ऑक्सिजनचा पुरवठा कमी तसेच रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा, बेड्सची अपुरी संख्या अशा अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्शवभूमीवर काही दिवसांपूर्वी  माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola