EXCLUSIVE तरूण का होतायत कोरोनाबाधित,संपूर्ण कुटुंबांना का होतोय कोरोना? डॉ.रवी गोडसे यांचं विश्लेषण
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज पुन्हा एकदा राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज 68 हजार 631 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 45 हजार 654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 31 लाख 6 हजार 828 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 70 हजार 388 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92 टक्के झाले आहे.