Soli Sorabjee Death : देशाचे माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचं कोरोनानं निधन

Continues below advertisement

Soli Sorabjee Death : देशाचे माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचं कोरोनानं निधन

प्रख्यात वकील, देशाचे माजी अटॉर्नी जनरल पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 91 वर्षाचे होते. सोली सोराबजी यांची ओळख एक तत्वनिष्ठ आणि मधुर व्यक्तीमत्व अशी होती. त्याच्या निधनावर देशातील अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 

सोली सोराबजी यांचं पूर्ण नाव सोली जहांगीर सोराबजी असं आहे. त्यांचा जन्म 1930 साली मुंबईमध्ये झाला. 1953 साली त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिसला सुरुवात केली. सोली सोराबजी 1971 साली सर्वोच्च न्यायालयात सीनियर काऊन्सलिंग झाले. सोली सोराबजी हे 1989 ते 1990 या काळात देशाचे अटॉर्नी जनरल होते. त्यानंतर पुन्हा एकदा 1998 ते 2004 या काळात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram