Mumbai Crime | सहा वर्षीय मुलीवर मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या घरमालकाच्या मुलाकडून बलात्कार
Continues below advertisement
मुंबईतल्या जोगेश्वरीच्या बेहराम बाग परिसरात एक सहा वर्षीय मुलीवर 23 वर्षीय मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने बलात्कार केल्याची घटना काल (29 एप्रिल) संध्याकाळी घडली आहे. सुनील सुखराम गुप्ता असे आरोपीचे नाव असून तो पीडित मुलीच्या घर मालकाचा मुलगा आहे. पीडित मुलीचे कुटुंब हे आरोपीच्या घरातील पोट माळ्यावर भाड्याने राहते. काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे ती आरोपीच्या घरी टीव्ही पाहण्यास गेली असता त्याने दरवाजा बंद करुन तिच्यावर बलात्कार केला. मुलीने थोड्याच वेळात घरी जाऊन घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर मुलीच्या कुटुंबाने याबाबत ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी आरोपी सुनीलला बेड्या ठोकल्या. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षेची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
Continues below advertisement