येत्या 6 महिन्यांत प्रत्येक वाहनाला Flex Fuel Engine अनिर्वाय, Nitin Gadkari यांची माहिती

Continues below advertisement

तुम्ही वाहन वापरत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण, येत्या 6 महिन्यात देशातील प्रत्येक वाहनाला फ्लेक्स फ्यूएल इंजिन अनिवार्य करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिलीय. पेट्रोल, डिझेल शंभरीपार गेल्यानं सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतोय.त्यामुळे इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉल, सीएनजी, बायो एलएनजी, इलेक्ट्रिक या पर्यायांवर चालणारं इंजिन बनवण्याच्या सूचना वाहन निर्मिती कंपन्यांना देण्यात आलेत. दरम्यान, सर्वात आधी फ्लेक्स फ्यूएल इंजिनसंदर्भात घोषणा गडकरींनी माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात केली होती. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram