Mehul Choksi:मेहुल चोक्सीला अटक झाल्यानंतरचे फोटो व्हायरल, कारागृहात मारहाण झाल्याच्या चोक्सीचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 May 2021 11:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची 13500 कोटींची फसवणूक करणारा मेहुल चोक्सी अँटिगा आणि बार्बुडा या कॅरेबियन बेटावरुन फरार झाला होता. त्याला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याचा अटक झाल्यानंतरचा पहिला फोटो हाती लागला आहे. चोक्सीचा हा फोटो डोमिनिकातील तुरुंगातील असल्याचं समोर आलं आहे. हा फोटो एएनआयनं आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. या फोटोत चोक्सीचा एक डोळा खूप लाल दिसून येत आहे.