FIR Registered on NIT Srinagar Student : एनआयटीत शिकणाऱ्या प्रथमेश शिंदेवर श्रीनगरमध्ये गुन्हा दाखल
Continues below advertisement
FIR Registered on NIT Srinagar Student: श्रीनगर: धार्मिक भावना भडकवणारा व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir Police) श्रीनगर एनआयटीमधील (Srinagar NIT) मराठी विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या विद्यार्थ्यांची एनआयटीनं हकालपट्टी केली आहे. प्रथमेश शिंदे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. विशेष म्हणजे, प्रथमेश शिंदे (Prathamesh Shinde) यानं शेअर केलेला व्हिडीओ याआधीच जगभरात कोट्यवधी लोकांनी पाहिला आणि शेअर केला होता.
Continues below advertisement