Farmers Protest : शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण; आज शेतकऱ्यांचा 'काळा दिवस'
Continues below advertisement
कोरोना संकटकाळात संयुक्त किसान मोर्चाने नव्या कृषी कायद्यांविरोधात आज देशभरात काळा दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. कारण आज कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. अशातच शेतकऱ्यांनी सर्व देशवासियांना या आंदोलनाला समर्थन करण्याचं आवाहन केलं असून तसेच आपल्या घरांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावून पाठिंबा दर्शवण्यास सांगितलं आहे. तसेच निषेध व्यक्त करत पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळण्याचंही आवाहन शेतकऱ्यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Continues below advertisement