Farm Laws Repeal : कायदे मागे, आता आंदोलनाचं पुढे काय? ABP Majha

Continues below advertisement

जेव्हा बळीराजा एकवटतो आणि तो सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष कायम ठेवतो तेव्हा काय होतं याची जाणीव करुन देणारी घटना काल घडली. तब्बल ३५८ दिवसांपासून राजधानीला वेढा घालून बसलेल्या शेतकऱ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलंच.. वादग्रस्त तीन केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा काल पंतप्रधान मोदींनी केली. देशवासियांना संबोधित करताना काल सकाळी मोदींनी घोषणा केली आणि शेतकरी वर्गानं एकच जल्लोष केला. पण आज याच शेतकरी आंदोलनाची पुढची रुपरेषा ठरणार आहे. मोदींनी घरी परतण्याचं आवाहन केलं असलं तरी संसदेत कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटलंय. परंतु आज शेतकरी आंदोलनाची पुढची रणनीती ठरवण्यासाठी सिंघु बॉर्डरवर संयुक्त किसान मोर्चाची बैठक बोलावली. या बैठकीला संयुक्त किसान मोर्चाचे ९ प्रमुख नेते उपस्थित होईल. ते आंदोलनाबाबत निर्णय घेणार असल्याचं कळतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola