Loan Fraud Case : सीबीआयकडून Chanda Kochhar आणि त्यांच्या पतीला अटक
Continues below advertisement
आयसीसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने दिल्लीमध्ये अटक केली आहे. व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जामध्ये अनियमितता केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या कारवाई करण्यात आली आहे. 2009 ते 2011 दरम्यान आयसीआयसीआय बँकेनं व्हिडिओकॉन समूहाला सुमारे 1875 कोटींचं कर्ज दिलं होतं. मात्र या आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप कोचर यांच्यावर करण्यात आला. त्यांच्या अटकेमुळे बँकींग आणि औद्योगीक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement