EPFO | ईपीएफओ सदस्यांच्या विमा रकमेत वाढ होण्याची शक्यता | ABP Majha
Continues below advertisement
एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन' अर्थात 'ईपीएफओ'तर्फे सभासदांच्या विम्याच्या रकमेत वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भात 'ईपीएफओ'ने विचार करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कमाल विम्याची रक्कम सध्याच्या सहा लाख रुपयांवरून १० लाख रुपयांपर्यंत आणि किमान विम्याची रक्कम अडीच लाखांवरून ४ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येण्याची चिन्हे आहेत.
Continues below advertisement