EPFO CBI: इपीएफओ कार्यालयातील आठ कर्मचाऱ्यांना साबीआयकडून अटक ABP Majha

Continues below advertisement

ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील १८ कोटी ९७ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयनं आठ कर्मचाऱ्यांना अटक केलीय. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कांदिवली कार्यालयातील ८ कर्मचाऱ्यांनी बनावट दावे करून १८ कोटी ९७ लाख रुपये लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयनं चौकशी करून कारवाई केलीय. या आठ कर्मचाऱ्यांना ईपीएफओनं आधीच निलंबित केलंय. ईपीएफओ कार्यालयातील क्लर्क चंदनकुमार सिन्हा हा या प्रकरणातला मास्टरमाईंड आहे. त्यानं अन्य सहकाऱ्यांच्या मदतीनं २०१९ ते २०२१ या काळात स्थलांतरित कामगारांच्या ८१७  खात्यांचा वापर करून बोगस दावे केले आणि कोट्यवधी रुपये उकळले. काही मजुरांच्या नावानं पीएफ खातं उघडून त्यानं मुंबईत बंद पडलेल्या २० कंपन्यांचे पीएफचे पैसे काढून घेतल्याचा आरोप आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram