Edible Oil Rates Reduced : खाद्यतेलाच्या किंमतीत घट, केंद्राकडून आयात शुल्कात कपात

Continues below advertisement

Edible Oil Price: महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे केंद्र सरकारने मोठा दावा केला आहे. खाद्य तेलाच्या किंमतीत घट झाली असल्याचे खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी खाद्य तेलाच्या किंमतीत 20, 18, 10 आणि 7 रुपयांची कपात झाली असल्याचे त्यांनी म्हटले. यामध्ये सुर्यफूल, शेंगदाणा, सोयाबिन आदी प्रमुख तेलांचा समावेश आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram