Eco Friendly Crackers Diwali 2022 : फटका फुटल्यानंतर उगवतील भाज्या फुलांचे रोपटे

Continues below advertisement

सुतळी बॉम्ब असो किंवा लवंगीची माळ. या फटाक्यांमुळे हमखास प्रदूषण होतं. मात्र आता आम्ही तुम्हाला असे फटाके दाखवणार आहोत, जे फोडल्यानंतर प्रदूषण तर होत नाहीच, मात्र जिथे फटाके फोडाल तिथं भाज्या, फुलांची रोपटं उगवतात. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाचे सीमेवरील पारडसिंगा, केळवद आणि सातोना गावातील महिलांनी हे बीज फटाके तयार केले आहे. त्यासाठी ग्राम आर्ट्स या संस्थेने पुढाकार घेतला आहे. दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाख्यामुळे मोठ्या प्रमाणावर विषारी प्रदूषण होत असल्यामुळे हे प्रदूषण थांबावे. आणि फटाक्यांच्या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या उद्दिष्टाने हे फटाके तयार करण्यात आलेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram