Earthquake : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के ABP Majha

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत... लखनौ, कानपूर, मुरादाबाद, बरेली, आग्रा आणि मेरठसह अनेक जिल्हे भूकंपाने हादरलेत... रात्री 8.52 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल इतकी होती तर मध्यरात्री 1.57 वाजता पुन्हा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता 6.3 इतकी होती... रात्री उशिरा झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली-एनसीआरमध्ये लोकांचा एकच गोंधळ पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशातील अनेक भागात मंगळवारी रात्री सुमारे पाच तासांच्या अंतराने दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. जमीन दुसऱ्यांदा जवळपास 20 सेकंद थरथरत होती. तर, एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भूकंपाचं केंद्रबिंदू असलेल्या नेपाळमधील डोटीमध्ये घर कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू झालाय.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola