
Dr Babasaheb Ambedkar Jayanti : बाबासाहेबांच्या 131व्या जयंतीदिनी देशभरात अनेक पद्धतीनं मानवंदना
Continues below advertisement
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीदिनी आज देशभरात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मानवंदना करण्यात येतेय. कुठे रांगोळी, कुठे वाळूशिल्प तर कुठे पुस्तकांद्वारे प्रतिकृती अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीनं महामानवाला अभिवादन करण्यात येतंय. हिंगोलीच्या कवडा इथल्या शाळेत विद्यार्थ्यांनी रांगोळीतून डॉक्टर आंबेडकर साकारले आहेत. नाशिकच्या चांदवडमध्ये पुस्तकांतून बाबासाहेबांची भव्य प्रतिकृती बनवली आहे. तर कल्याणमध्ये 2 हजार 51 वह्यांचा वापर करून सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे डॉक्टर आंबेडकरांची प्रतिकृती तयार करण्यात आलीय. वेंगुर्ल्यातील सागरेश्वर किनाऱ्यावर रविराज चिपकार यांनी वाळूशिल्प साकारलं आहे. तर कणकवलीत सुमन दाभोलकर यांनी स्टोन आर्टमधून बाबासाहेब आंबेडकर साकारले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Abp Majha Dr. Babasaheb Ambedkar Babasaheb Ambedkar Ambedkar Jayanti ABP Majha Abp Maza Live Dr. Babasaheb Ambedkar