Diwali 2022 : देशभरात दिवाळीचा उत्साह, ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक, भारतीयांचा आनंद द्विगुणीत
देशभरात आज दिवाळीचा उत्साह पाहायला मिळालाय. कोरोना संकटानंतर 2 वर्षांनी आज निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात आलीय. देशभरात लक्ष्मीपूजन करण्यात आलं. तर मंदिरांनाही आकर्षक रोषणाई करण्यात आली. दुसरी भारतीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची वर्णी लागलीय. तर पंतप्रधान मोदींनी आज कारगिलमध्ये जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशन केलंय. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधानांप्रमाणे गडचिरोलीत पोलीस आणि जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. उद्या मुख्यमंत्री शिंदे गडचिरोली दौैऱ्यावर आहेत.