Diwali 2021 : दिवाळीत भारतीयांनी चीनला शिकवला धडा; चिनी बनावटीच्या वस्तूंकडे भारतीयांची पाठ
दिवाळीत भारतीयांनी चीनला धडा शिकवलाय. दिवाळीत भारतीयांनी स्वदेशाचा नारा देत चीनी बनावटीच्या वस्तू्ंवर बहिष्कार टाकलाय. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या दाव्यानुसार देशात गुरुवारी दुपारपर्यंत 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झालाय. यावेळी नागरिकांनी स्वदेशी वस्तू विकत घेण्याला प्राधान्य दिलं. त्यामुळे चीनला जवळपास 50 हजार कोटींचा फटका बसला. दुकानदारांनी आपल्या दुकानात आणि शोरूममध्ये चिनी वस्तू नाकारल्या. त्याचबरोबर दिवाळीला खरेदीसाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांनीही चीनी बनावटीच्या वस्तू घेण्यास नकार दिला. यामुळे चीनला सलग दुसऱ्या वर्षी इतका मोठा फटका बसलाय.