Diwali 2021 : गोव्यात नरकासूर दहन करुन दिवाळी साजरी ABP Majha
गोव्यात नरक चतुर्दशीला नरकासुराचं दहन करण्याची परंपरा आहे. नरकासुराच्या मोठमोठ्या प्रतिमा तयार करून त्या जाळल्या जातात. याच दिवशी श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे. गोव्यात दिवाळीच्या या दिवशी आधी नरकासुराची मिरवणूक काढली जाते आणि नंतर नरकासूर दहन केलं जातं. गोव्यातल्या गावागावात नरकासुराच्या प्रतिमा बनवल्या जातात.