BSF Jurisdiction : Punjab सह तीन राज्यात सीमा सुरक्षा दलाचं अधिकारक्षेत्र 50 किमीपर्यंत वाढल्याने वाद

Continues below advertisement

केंद्रीय गृहमंत्रालयानं पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये सीमा सुरक्षा दलाचं अधिकार क्षेत्र 50 किलोमीटरपर्यंत वाढवलं आहे. त्यामुळे या तीनही राज्यांत सीमेपासून 50 किलोमीटरपर्यंतच्या भागात ड्रग्ज पकडण्यासाठी तपासणी, अटक आणि जप्तीची कारवाई करू शकतील. आधी हे क्षेत्र 15 किलोमीटर इतकं होतं. ते वाढवल्यानं आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय. केंद्र सरकारचा हा निर्णय एकतर्फी असून देशाच्या संघराज्य व्यवस्थेवर हा हल्ला आहे, असं सांगत मुख्यमंत्री चन्नी यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram