Congress President Update: काँग्रेस अध्यक्षपद प्रक्रियेत खर्गे यांच्यासाठी दिग्विजय सिंह यांची माघार
abp majha web team
Updated at:
30 Sep 2022 02:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दिल्लीत घडामोडी सुरु आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी काँग्रेस ढोलताशांच्या गजरात मुख्यालयात दाखल होत अर्ज भरला. तर झारखंडचे प्रदेशाध्यक्ष कृष्णानंद त्रिपाठी यांनीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. मल्लिकार्जुन खर्गे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते काँग्रेस मुख्यालयात दाखल झालेत. खर्गे यांच्यासाठी दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. खर्गे यांना जी २३ गटातील नेत्यांचाही पाठिंबा मिळाल्याचं दिसतंय. पृथ्वीराज चव्हाण, आनंद शर्मा, मनीष तिवारी हे जी २३ गटातील नेतेही खर्गे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले आहेत.