Digital Mapping: लवकरच घराचा पत्ता डिजिटल होणार? ABP Majha
देशातल्या तुम्हा आम्हा प्रत्येक नागरिकाला जसा एक आधार क्रमांक मिळालाय तसाच आता प्रत्येक घराला एक युनिक कोड मिळणार आहे. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. लवकरच एक कोड नंबर तुमच्या घराचा नवा पत्ता असणार आहे. त्यामुळं तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी घराच्या पत्त्याच्या पुराव्याची गरज भासणार नाही. काय आहे ही घराची युनिक कोड योजना? स्पेशल रिपोर्टमधून.