Digital Currency India : डिजिटल चलनालाही 'बँक नोट' इतकेच महत्त्व पाहिजे - RBI चा प्रस्ताव

Continues below advertisement

भारत सरकार क्रिप्टोकरन्सी म्हणजे स्वतःचं डिजिटल चलन आणण्याचा विचार सुरू असताना त्याचं महत्त्व बँकेच्या नोटेइतकंच असावं, असा प्रस्ताव रिझर्व बँकेनं दिलाय. क्रिप्टोकरन्सीचं नियमन करण्यासाठी सरकार लवकरच विधेयक आणणार आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटल चलन बँक नोटच्या व्याख्येत ठेवावं, म्हणजेच डिजिटल चलनाला बँक नोट म्हणून देखिल पाहिलं जावं, असा रिझर्व बँकेचा प्रस्ताव आहे. अर्थ मंत्रालयानं लोकसभेत लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली. देशातील बिटकॉईनला चलनाटचा दर्जा देण्याचा प्रस्ताव नसल्याचंही सरकारनं स्पष्ट केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram