Dhananjaya Chandrachud : धनंजय चंद्रचूड आज 50 वे सरन्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेणार
Continues below advertisement
मराठमोळे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आज भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात सकाळी १० वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यायमूर्ती चंद्रचूड यांना शपथ देतील. पुढची दोन वर्षे ते या पदावर राहतील. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड १९७८ ते १९८५ या काळात भारताचे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड तब्बल ७ वर्षे ४ महिने इतका सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदावर राहिले. वडिलांनंतर या सर्वोच्च पदावर पोहोचलेले न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आज शपथ घेतील. पुण्यातलं कन्हेरसर हे न्यायमूर्ती चंद्रचूड यांचं मूळ गाव आहे.
Continues below advertisement