Anti-Covid Drug DRDO: आपत्कालीन वापरासाठी DGCI परवानगी, 2 डीऑक्सी-डी-ग्लुकोज औषध कोरोना किलर!

Continues below advertisement

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ड्रग्स कंन्ट्रोल जनरल ऑफ इंडियाने कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिला आहे. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्यूरल अॅंड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी एकत्र येत या औषधांची निर्मिती केली आहे. या औषधाला सध्या 2-deoxy-D-glucose (2-DG) असं नाव देण्यात आलं आहे. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबरोटरिजवर देण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram