Maharashtra Winter Session : अधिवेशनाच्या संदर्भात राच्य सरकारची बोटचेपी भुमिका : देवेंद्र फडणवीस
Maharashtra Assembly Winter Session : राज्याचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपासून मुंबईमध्ये होणार आहे. दुसऱ्या आठवड्यात 27 आणि 28 डिसेंबर दरम्यान असणार आहे. अधिवेशन वाढवायचं किंवा नाही याचाही विचार केला जाईल, असं राज्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे. या हिवाळी अधिवेशनात एकूण 12 विधेयकं असणार आहेत. तर तारांकीत प्रश्नांसंदर्भात गुरुवारी सभापती यांच्याकडे बैठक होणार आहे, असं परब यांनी सांगितलं. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Tags :
Maharashtra Assembly Maharashtra Assembly Winter Session Maharashtra Winter Session Devendra Fadnavis Uddhav Thackeray