Devendra Fadnavis : व्हीआयपी प्रोटोकॉल टाळून देवेंद्र फडणवीस सामान्य प्रवाशांच्या रांगेत
हरियाणातील सूरजकुंड इथं गृहमंत्र्यांच्या बैठकीसाठी निघालेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचले. यावेळी ते सामान्यांप्रमाणे रांगेत उभे असलेले दिसले. बैठकीसाठी फडणवीस दिल्लीत पोहोचले. त्यानंतर ते हरियाणाकडे रवाना झाले. यावेळी व्हीआयपी प्रोटोकॉल टाळून दिल्ली विमानतळावर ते सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे रांगेत उभे होते.