Dengue : डेंग्यूच्या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलला DCGI चा हिरवा कंदील
Continues below advertisement
मलेरियावर लस शोधल्यानंतर आता वैज्ञानिकांना डेंग्यूवर देखील औषध शोधण्यात यश आलंय. लवकरच या औषधांची रुग्णांवर चाचणी होणार आहे. देशभरातल्या 20 केंद्रांमध्ये जवळपास 10 हजार रुग्णांवर या औषधाची चाचणी करण्यात येणार आहे. ज्यात मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद या केंद्रांचा समावेश आहे. डेंग्यूवर आतापर्यंत ठोस असं औषध नसल्यानं अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र मुंबईतल्या सन फार्मा कंपनीनं डेंग्यूवर यशस्वी औषधाची निर्मिती केलीय. त्याला DCGI या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलला हिरवा कंदील दिलाय.
Continues below advertisement