Shirdi Sai Baba Temple | शिर्डीत भक्तीचा बाजार; काकड आरतीसाठी पैशांची मागणी?
Continues below advertisement
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यातील मंदिर सुरू करण्यात आली आणि नियमावलीसह मंदिरात प्रवेश सुरू झाला. साई मंदिरात वाढती गर्दी लक्षात घेत दररोज 12 ते 15 हजार भाविकांना साई दर्शन आणि मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत मंदिरातील सर्व आरत्या पार पडणार असल्याच नियोजन करण्यात आलं आहे. या नियोजनात ऑनलाईन सुविधेवर जास्त भर देण्यात आलं. मात्र 15 दिवस प्रयत्न करून काकड आरतीचा पास मिळत नसल्याने दिल्ली येथील साई भक्तांनी शिर्डीतील पी आर ओ ऑफिसला जात आरतीचा पास मिळण्यासाठी प्रयत्न केले असता जर 25 हजार रुपये डोनेशन दिल तर काकड आरतीचा पास उपलब्ध होईल अस उत्तर मिळाला असल्याचा आरोप दिल्ली येथील महिला साईभक्तांनी केलाय. जो प्रथम येईल त्याला पास मिळाला पाहिजे असं सांगताना 15 दिवस ऑनलाईन पास मिळत नाही आणि इथे आल्यावर डोनेशन दिल तर पास मिळेल अस सांगितलं जातं असल्यानं या महिलांनी संथानच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केलाय
Continues below advertisement