Harsimran Kaur Badal Resigned |कृषी धोरणावरून एनडीएत फूट? केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांचा राजीनामा

Continues below advertisement

कृषी धोरणावरून एनडीएमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं आहे. मोदी मंत्रिमंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सरकार शेतकरी विरोधी विधेयक आणत असल्याचा आरोप करत थेट राजीनामा दिला आहे. त्यांनी आज (17 सप्टेंबर) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत ट्वीट करुन माहिती दिली. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

हरसिमरत कौर यांचे ट्वीट..
हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्वीट करत म्हटलं, “मी शेतकरी विरोधी विधेयक आणि कायद्यांचा विरोध करत केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. शेतकऱ्याची मुलगी आणि बहिण म्हणून त्यांच्यासोबत उभी राहिल्याचा मला अभिमान आहे.” जर सरकारने आज शेतकरी विरोधी विधयेक मांडली तर अकाली दलाच्या केंद्रीय मंत्री आपला राजीनामा देतील, असे सुखबीर बादल लोकसभेत बोलले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram