India China Face Off | पंतप्रधानांची आज सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा, बैठकीसाठी निकष लागू
भारत-चीन सीमेवरील हिंसक झटापटीनंतर एलएसीवर तणाव आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. भारत-चीन सीमेवरील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी ही सर्वपक्षीय व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी पाच वाजता बैठकीला सुरुवात होईल. या व्हर्च्युअल बैठकीत विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष सहभागी होतील.