Delhi Police Action : दिल्ली पोलिसांची भुसावळमध्ये कारवाई, सिमीशी संबंधित व्यक्तीला अटक

Continues below advertisement

Delhi Police Action : दिल्ली पोलिसांची भुसावळमध्ये कारवाई,सिमीशी संबंधित व्यक्तीला अटक 
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून  जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहारामधून एकाला ताब्यात घेण्यात आलंय. सदर व्यक्ती सिमी  संघटनेशी संबंधित असल्याचं सांगितले जात आहे. भुसावळ शहरातील मिल्लत नगर भागात राहणाऱ्या एकाला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतलंय. हानिफ शेख  असे संशयित आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरुद्ध २००१ मध्ये युएपीए अंतर्गत दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या घटनेची वृत्त पसरताच शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  झाले. दरम्यान, संशयित हानिफ शेख हा एका शाळेत शिक्षक आहे. तसेच २००१ मध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'सिमी'चे निघणारे मासिक 'इस्लामिक मुव्हमेंट'मध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याच्या गुन्ह्यात हानिफवर आरोप आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram