NRI Voting Rights | अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क द्यावा, निवडणूक आयोगाचा सरकारला प्रस्ताव
अनिवासी भारतीयांना (NRI) पोस्टल बॅलेटच्या आधारे मतदानाचा हक्क देण्यात यावा असा प्रस्ताव निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला पाठवला आहे. यासाठी केंद्र सरकारला कंडक्ट ऑफ इलेक्शन रुल्स,1961 या अधिनियमात सुधारणा करावी लागेल. विशेष म्हणजे याला संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नाही.