Jawaharlal Nehru Universit Delhi :दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ पुन्हा एकदा वादात,दोन गटात राडा
Jawaharlal Nehru Universit Delhi : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ पुन्हा एकदा वादात
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ पुन्हा एकदा वादात सापडलं आहे. याचं कारण म्हणजे दोन गटात झालेला राडा. दोन गटातील विद्यार्थ्यांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. परंतु वादाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक जिंकण्यासाठी डावे, उजवे तसंच विविध संघटनेचे विद्यार्थी जोरदार प्रचार करत आहेत. यासाठी कॅम्पसमध्ये दररोज काही ना काही कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र यादरम्यान आता हाणामारीची घटना समोर आली आहे.