Delhi Ghaziabad : गाझियाबादमध्ये पोलिसांकडून रिव्हर्स पाठलाग, दिल्लीजवळ कधी न पाहिलेला पाठलाग
Delhi Ghaziabad : गाझियाबादमध्ये पोलिसांकडून रिव्हर्स पाठलाग, दिल्लीजवळ कधी न पाहिलेला पाठलाग
दिल्लीलगतच्या गाझियाबादमध्ये एक विचित्र घटना घडली. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांनी गाडीचा पाठलाग केला. यात अजब गोष्ट म्हणजे पळून जाणारी कार रिव्हर्समध्ये धावत होती, आणि पोलीस तिचा पाठलाग करत होते. शेजारून जाणाऱ्या कारचालकानं हा व्हिडीओ काढला आहे. सोशल मीडियावर हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. पोलिसांनी अन्य कारचालकांची सुरक्षा धोक्यात घालून हा पाठलाग करायला हवा होता का, यावर बराच वाद घातला जातोय. मुळात, आपल्या देशात रस्ते सुरक्षेची स्थिती इतकी दयनीय आहे, की अनेकदा पोलिसांनी अजब युक्त्या वापरून नियम मोडणाऱ्यांना पकडावं लागतं. पोलिसांनी थांबण्याचे निर्देश दिल्यावर पळून जाण्याचे प्रकारही आपल्याकडे सर्रास घडत असतात. मुळात, पाश्चिमात्य देशांप्रमाणं रस्ते वाहतूक नियम प्रचंड कडक करण्याची नितांत गरज आहे असं रस्ते सुरक्षा तज्ज्ञांचं मत आहे.