Delhi Election Result 2025 : दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप सत्तेत, विधानसभेत फुललं कमळ

Delhi Election Result 2025 : दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप सत्तेत, विधानसभेत फुललं कमळ 
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचं कमळ फुललं. मात्र त्याहूनही मोठा धक्का आपला बसला तो म्हणजे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला.  नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांना पराभूत करत भाजपचे परवेश वर्मा हे जायंट किलर ठरले. त्याचबरोबर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियाही या निवडणुकीत पराभूत झाले. जंगपुरा मतदारसंघातून सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या तरविंदरसिंग मारवाह यांच्याकडून सिसोदिया पराभूत झालेत.  केजरीवाल आणि सिसोदियांच्या पराभवाचा सर्वात मोठा धक्का आपला सहन करावा लागलाय.
आम आदमी पक्षाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत भाजपनं दिल्लीत घवघवीत यश मिळवलंय...जवळपास तीन दशकाचा भाजपचा दिल्ली विधानसभेतला विजनवास संपुष्टात आलाय...केजरीवालांचा भक्कम बालेकिल्ला भाजपनं उद्ध्वस्त करून भाजपनं दिल्लीत एकहाती सत्ता खेचून आणलीय...
केजरीवालांना भ्रष्टाचारी ठरवण्यापासून अनेक मुद्द्यांवर भाजपनं दिल्लीत बारकाईनं काम केलं...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola