Delhi Cold Wave : राजधानी दिल्लीत पारा घसरला, गारठा वाढला ABP Majha
Continues below advertisement
उत्तर भारतात थंडीचे सर्व रेकॉर्ड तोडलेत. सकाळी ८.३० वाजेपर्यंत दिल्लीचं आजचं किमान तापमान तब्बल ३.१ अंशांपर्यंत खाली आलंय. दिल्लीतील लोधी रोड परिसरात ३.१ अंश, सफदरजंगमध्ये ३.२, आया नगरमध्ये ३.६, दिल्ली रिजमध्ये ५ अंश तर पालममध्ये ५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. त्यामुळे राजधानी दिल्लीत गोठवणारी थंडी पाहायला मिळतेय. दिल्लीकरही काम असेल तरच ऊबदार कपडे घालून घराबाहेर पडताहेत.
Continues below advertisement