Delhi Chalo Protest | पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांचं आंदोलन, आंदोलकांना रोखण्यासाठी वॉटर कॅननचा वापर
Continues below advertisement
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्ली चलो आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांनी आज दिल्लीत मोर्चाचे आयोजन केले होते परंतु पोलीसांनी त्याला परवानगी दिली नाही. दिल्ली-हरियाणा सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी शेतकरीही मोठ्या संख्येने जमले आहेत. त्याच ठिकाणी आता शेतकरी निदर्शनं करत आहेत.
Continues below advertisement