Covid Testing Centre Scam | नवी मुंबईत कोविड सेंटरमधल्या घोटाळाचा 'एबीपी माझा'कडून पर्दाफाश
नवी मुंबईत कोविड सेंटरमधल्या घोटाळाचा 'एबीपी माझा'कडून पर्दाफाश करण्यात आला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आकडा फुगवण्यासाठी टेस्टिंगला आलेल्या रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांचेही बनावट अहवाल बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, 10 वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, अशा व्यक्तींचेही कोरोना रिपोर्ट तयार केल्याचं समोर आलं आहे.