Delhi Terror Attack: दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्लाच, केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnaw यांची घोषणा

Continues below advertisement
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या स्फोटाला दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) म्हणून घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Union Minister Ashwini Vaishnaw) यांनी दिली. या घोषणेनंतर भारताच्या पुढील रणनितीवर संरक्षण तज्ज्ञ लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी भाष्य केले आहे. त्यांच्या मते, 'कुठलाही दहशतवादी हल्ला हा भारतावर एक प्रकारे युद्ध फुकण्याचा प्रकार असं त्या ठिकाणी मानलं जाईल आणि आता याची पाळं मुळं जर पाकिस्तानची किंवा दुसऱ्या राष्ट्राची त्या ठिकाणी निघाली तर नक्कीच त्या राष्ट्रामध्ये घुसून कारवाई करण्याइतपत अशाप्रकारची आपली सध्याची रणनीती त्या ठिकाणी सांगते'. स्फोटानंतर सुमारे ४८ तासांनी तपास पूर्ण झाल्यावर सरकारने ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना पुढील कारवाईसाठी स्पष्ट दिशा मिळाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola