ABP News

Delhi Result 2025 : 'आप'चा गड ढासळला! केजरीवालाचं नेमकं काय चुकलं? Rajiv Khandekar यांचं विशलेष्ण

Continues below advertisement

Delhi Election Result 2025 : दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी अर्थात आप या पक्षाला जबर धक्का बसला आहे. येथील मतदारांनी दिल्लीतील आप पक्षाचं गेल्या 10 वर्षांतील साम्राज्य उलथवून लावलं आहे. आता येथे भाजपाचे सरकार स्थापन होत आहे. दरम्यान, या निवडणुकीत आप पक्षाचा चेहरा असलेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या निकालानंतर आता त्यांच्या पराभवाचं नेमकं कारण काय? असं विचारलं जात आहे. 

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? 

दिल्लीची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकद लावली होती. त्याचाच परिणाम आता प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी दिसत आहे. कारण येथे भाजपाने जोरदार आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार आप पक्ष फक्त 27 जागांवर पुढे आहे. तर भाजपा एकूण 47 जागांवर आघाडी आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला दिल्लीच्या निवडणुकीत एकही जागा मिळालेली नाही. म्हणजेच आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपा दिल्लीमध्ये एकहाती सत्ता स्थापन करणार आहे. 

अरविंद केजरीवाल यांचाही पराभव 

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आप पक्षाचा चेहरा आहेत. या पक्षाने गेल्या तीन निवडणुका तसेच यावेळची निवडणूक अरविंद केजरीवाल यांचा चेहरा समोर करून लढवली. यावेळच्या निवडणुकीत मात्र अरविंद केजरीवाल यांचा चेहरा फारशी कमाल करू शकला नाही. विशेष म्हणजे खुद्द अरविंद केजरीवाल हेदेखील त्यांच्या नवी दिल्ली या मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांना भाजपाच्या परवेश सिंह यांनी पराभूत केले आहे. ते नवी दिल्ली मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram