
Delhi Pollution : राजधानी दिल्लीने तोडला प्रदूषणाचा रेकॉर्ड, हवेची गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीत
Continues below advertisement
राजधानी दिल्लीत गेल्या 5 वर्षातला प्रदूषणाचा रेकॉर्ड तुटला आहे. दिल्लीसह उत्तर भारतात प्रदूषणात वाढ झाली असून नोव्हेंबरच्या सुुरुवातीपासूनच देशात हवेची गुणवत्ता ढासळत आहे. पंजाब आणि हरियाणात धान काढल्यानंतर टाकाऊ पेंड्या जाळल्यामुळे उत्तर भारतात प्रदूषणात वाढ झाली आहे. मात्र दिवाळीत दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात फटाक्यांमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने फटाक्यांवर पूर्ण प्रतिबंध लावले असतानाही दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. त्यामुळे इथली हवेचा गुणवत्ता निर्देशांक गंभीर स्थितीत पोहोचला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रास जाणवू लागलाय. घशात आणि डोळ्यात जळजळ, पाणी येणे यासारखा त्रास जाणवू लागला.
Continues below advertisement