PM Modi Ram Mandir | राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वेळापत्रक कसं असेल?

ऐतिहासिक राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी अयोध्येला पोहचणार आहेत. या कार्यक्रमाला 200 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी साधू, संत, अधिकारी, नेता, विहिप-न्यास यांच्या व्यतिरिक्त देशातील 50 विशेष अतिथी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर 5 ऑगस्टला सकाळी 11.30 वाजता अयोध्येतील साकेत महाविदयालयाच्या पटांगणात उतरेल. यानंतर ते पहिल्यांदा हनुमान गढीला किंवा राम जन्मभूमीकडे जातील हे अद्याप निश्चित झालेलं नाही. परंतु सध्या चर्चा अशी आहे की, राम जन्मभूमीच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 तास संबोधन करणार आहेत. ज्याचं प्रसारण अयोध्येत ठिकठिकाणी एलईडी स्क्रिन लावून करण्यात येणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola